25 वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या; कराड तालुक्यातील धक्कादायक घटना
25 वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या; कराड तालुक्यातील धक्कादायक घटना Saam TV
महाराष्ट्र

Karad : 25 वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून हत्या; कराड तालुक्यातील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कराड : कार्वे - कोरेगाव येथे एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कार्वे - कोरेगाव रस्त्यालगत ऊसाच्या शेतात जाण्यासाठी असणाऱ्या रत्याच्या मधोमध या तरुणीची मृतहेद सकाळच्या सुमारास आढळून आला. सदर तरुणीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तरुणीच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा असून तिचा चेहरा रक्ताने माखला असल्याने तिची ओळख अद्याप पटलेली नाही. तरुणीचं वय 25 वर्ष असल्याचा अंदाज आहे.

कराड (Karad) तालुक्यातील कोरेगाव आणि कार्वे गावच्या शिवेवरती असणाऱ्या भैरवनाथ मंदीराजवळ ही घटना घडली आहे. नागरिकांच्या निदर्शनास तरुणीचा मृतदेह येताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा सुरु केला असून कराड तालुका पोलीस (Karad Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक भैरवनाथ कांबळे, भरत पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान आज सकाळी झालेल्या हा हत्येमुळे कोरेगाव आणि कार्वे दोन्ही गावामध्ये एकच खळबळ उडाली असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या (Savitribai Fule) जयंती दिवशीच एका तरुणीचा खून होणं ही निंदनिय गोष्ट असल्याची प्रतिक्रिया कोरेगांव मधील ग्रामस्थ देत आहेत. तर सध्या एसटी बंद असल्यामुळे घटना घडलेल्या रस्त्यावरुन रोज कोरेगांव मधील लहान ते कॉलेजवयीन मुली शाळा कॉलेजसाठी कार्वेपर्यंत चालत जात असतात. या घटनेमुळे घाबरलेले मुलींच्या घरचे पालक आता आमच्या मुलींना शाळेत पाठवायचं कसं? असा सवाल विचारत असून गावात लवकरात लवकर ST सेवा सुरु करण्याची मागणी देखील होतं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT