Nashik Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: दुर्दैवी! मित्राला वाचवायला गेला अन्... मन सुन्न करणारी घटना

Crime News: पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात एका २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात पेवर ब्लॉक डोक्यात टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Shivani Tichkule

तबरेज शेख

Nashik News: पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात एका २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात पेवर ब्लॉक डोक्यात टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिकच्या सावता नगर परिसरात घडली आहे.  (Latest Marathi news)

परशुराम निरंजन (२४) हा तरुण सावता नगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला असता त्याच्या सोबत असलेल्या मित्राचे आणि संशयीतांचे जुने भांडण होते. त्याची कुरापत काढून सुमारे तीन ते चार संशयतांनी परशुराम व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली.

परशुराम प्रतिकार करत असताना संशयतांनी हॉटेलच्या बाहेर पडलेल्या पेवर ब्लॉक त्याच्या डोक्यात टाकला. परशुरामचे मित्राने त्याला जवळच्या खाजगी इस्पितळात उपचारासाठी नेले होते. मात्र अती रक्तस्रावमुळे परशुरामला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Nashik News)

यावेळी उपचार सुरु असताना परशुरामचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपासणी करून रात्री चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मात्र या संपूर्ण घटनेमुळे नाशिकच्या (Nashik) गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याची चर्चा सुरु आहे. ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर (Police) मोठे आव्हान उभे राहिले असून 15 दिवसांपूर्वी याठिकाणी भर दिवसा गोळीबार झाला होता आणि आता खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT