Gayatri Tarare Bhandara News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News : सर्पदंशाने २४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना

गायत्री हंसराज तरारे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : घरकाम करताना सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील किन्ही येथे घडली. गायत्री हंसराज तरारे (24) राहणार किन्ही असे मृत विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी गायत्री या आपल्या राहत्या घरी काम करत होत्या. त्यावेळी अचानक विषारी सापाने चावा घेतला. (Bhandara Latest Marathi News)

आपल्याला सर्पदंश झाल्याचं लक्षात येताच गायत्री यांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. गायत्री यांना सर्पदंश झाल्याचे कळताच गावात एकच खळबळ उडाली. गायत्री यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भंडारा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तेथे गायत्रीवर उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, उपचार सुरू असताना रात्री गायत्रीची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नेहमी हसत-मुखत राहणाऱ्या गायत्रीचा अचानक सर्पदंशाने मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT