mangalvedha sinchan yojana saam tv
महाराष्ट्र

मंगळवेढा : दुष्काळी भागातील शेतकरी आक्रमक; लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्धार

mangalvedha sinchan yojana : आमचे रक्त घ्या पण पाणी द्या. महाराष्ट्र सरकार पाणी देणार नसेल तर येथील गावकऱ्यांनी थेट कर्नाटकात जायची तयारी दर्शवली आहे.

भारत नागणे

Pandharpur :

आचारसंहितेपूर्वी (code of conduct) मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला (mangalvedha sinchan yojana) मंजुरी द्या अन्यथा लोकसभा निवडणुकीवर (loksabha election 2024) बहिष्कार टाकू असा इशारा मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी भाग असलेल्या 24 गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी दिला आहे. या भागात झालेल्या पाणी परिषदेत गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान या आंदोलनाला तुतारीचा वास येत असल्याचा आरोप भाजपच्या माजी सरपंच यांनी केला आहे. यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न पेटण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. (Maharashtra News)

गेल्या ५० वर्षापासून मंगळवेढा तालुक्यातील २४ गावे ही दुष्काळात आहेत. सन २००९ साली पाणी प्रश्नावरून यांचं गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आता पुन्हा पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आमचे रक्त घ्या पण पाणी द्या. महाराष्ट्र सरकार पाणी देणार नसेल तर येथील गावकऱ्यांनी थेट कर्नाटकात जायची तयारी दर्शवली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली असून येत्या तीन‌ चार दिवसांत भेट होणार आहे. दरम्यान पाणी पाणी प्रश्नावरून महायुतीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाणी परिषदेचे संयोजक अंकुश पडवळे हे शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.‌ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला तुतारीचा वास येत असल्याचा आरोप नंदेश्वरचे माजी सरपंच भारत गरंडे यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT