22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेज हॉस्टेलमध्ये आत्महत्या सागर गायकवाड
महाराष्ट्र

22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेज हॉस्टेलमध्ये आत्महत्या

सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये BAMS च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : नाशिकमधील (Nashik) सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये BAMS च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रुती सानप (Shruti Sanap) वय 22 असं आत्महत्या केलेल्या युवतीच नाव असून ती मुळ बीड (Beed) जिल्ह्यातील रहिवासी आहे.

हे देखील पहा -

श्रुती सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये बीएएमएसच्या (BAMS) तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. सदर आत्महत्येची घटना काल दुपारी कॉलेजच्या हॉस्टेल (College Hostel) मध्ये घडली आहे. दरम्यान श्रुतीने वस्तीगृहामधील आपल्या खोलीमधील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले असून आत्महत्या कोणत्या कारणाने केली शैक्षणिक, की आणखी काही कारण होतं ते समजू शकलं नाही. पंचवटी पोलिसांकडून (Panchavati Police) या घटनेतील पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

Maharashtra Live News Update: काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

SCROLL FOR NEXT