20 year old girl death yerala river sangli saam tv
महाराष्ट्र

Sangli Tragedy : वडिलांना बुडताना बघितलं, थेट नदीत उडी घेतली; २० वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू

daughter jumps into river to save father dies sangli : सांगलीतील भाळवणी येथील येरळा नदीमध्ये आठ मुले बुडाली. या मुलांना काठावर असलेल्या पालकांनी वाचवलं. पण वडिलांना बुडताना बघून त्यांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या २० वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

विजय पाटील, सांगली | साम टीव्ही

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात भाळवणी येथे शिकलगार मळ्याच्या परिसरात दुर्दैवी घटना घडली. येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीमध्ये बुडाली. त्यातील सर्वांना वाचवण्यात यश आले. पण एका २० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वडिलांना बुडताना बघून तिनं नदीत उडी मारली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. फिरदोस जाकीर शिकलगार असे मुलीचे नाव आहे. ती मूळची कोरेगावची होती. सध्या ती मुंबईत वास्तव्यास होती.

भाळवणी येथे शिकलगार मळ्यामध्ये लग्न सोहळ्यासाठी मुंबई आणि इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी आली होती. येथील मंगल कार्यालयात लग्नसोहळा सुरू असताना काही जण तेथून जवळच असलेल्या येरळा नदीवर पोहण्यासाठी गेले. त्यात आठ ते दहा लहान मुलं-मुली होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पालक सुद्धा होते.

मुलं नदीपात्रातील पाण्यात खेळत होती. तर त्यांचे पालक नदीकाठी थांबले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं मुलांपैकी काही जण खोल प्रवाहात गेली. ते बुडू लागले. ते पालकांनी बघितले. त्यांना वाचवण्यासाठी काही जण धावले. या सर्व गोंधळात सात ते आठ जण बुडाले. नदीच्या काठावर असलेले पालक आणि इतर जणांनी नदीमध्ये उडी मारून बुडणाऱ्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सात जणांना वाचवण्यात यश आले.

या मुलांना वाचवण्यासाठी नदीत उतरलेल्या पालकांपैकी काही जणांना पोहताही येत नव्हते. त्यांनी देखील आपल्या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली होती. त्यात वडील बुडत असल्याचे बघितल्यानंतर काठावर असलेल्या फिरदोसने क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात फिरदोस बुडाली. सर्व मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तीन ते चार मुले अत्यवस्थ होते. त्यांना विटा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. फिरदोस जाकीर शिकलगार या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मै अभी..; VIDEO

Maharashtra News Live Update: चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध

दिल्लीतील पोलिसांनी लाज आणली, जंतरमंतरवर खाकीतील रक्षक की भक्षक?

शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

SCROLL FOR NEXT