Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये चेंबरमध्ये पडले 4 तरुण, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Latest News: संभाजीनगर शहरातील गुलाब गार्डनसमोरील चेंबरमध्ये सोमवारी चार तरुण पडले.

Priya More

Sambhaji Nagar News: चेंबरमध्ये (Underground Sewer) पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली आहे. या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर शहरातील गुलाब गार्डनसमोरील चेंबरमध्ये सोमवारी चार तरुण पडले. या चौघांपैकी दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या दोन तरुणांना चेंबरबाहेर काढण्यात यश आले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेमध्ये अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे या तरुणांचा मृत्यू झाला. तर विष्णू उगले आणि आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही तरुणांना चेंबरबाहेर काढून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यामधील विष्णू उगलेची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयातल्या मेडीसिन विभागात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हे तरुण चेंबरमध्ये कसे पडले याची माहिती समोर आली नाही. दरम्यान, संभाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT