ratnagiri , vijaydurg, ship saam tv
महाराष्ट्र

विजयदुर्ग किनार्‍यानजीक दुबईतील जहाज बुडालं; १९ जणांना वाचविण्यात यश

अद्याप ही मदतकार्य सुरु आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Sindhudurg News : जहाजाच्या तळाला मोठे भोक पडल्याने विजयदुर्ग किनार्‍यापासून चाळीस वावमध्ये तेल वाहतूक करणारे दुबई येथील पार्थ हे जहाज बुडाले आहे. हे जहाज दुबईतून (dubai) बंगळूरच्या (banglore) दिशेने जात होते. रत्नागिरीतील (ratnagiri) तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य सूरू केल्यामुळे त्या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

हे जहाज दुबई येथील आहे. ते बंगळूरला निघाले हाेते. जहाजाच्या तळाला भोक पडल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. या दुर्घटनेची माहिती समजताच रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले.

सध्या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. अद्याप ही मदतकार्य सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT