माळूब्रा गावात 19 कोरोना रुग्ण, गाव सील करण्यचे आदेश दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

माळूब्रा गावात 19 कोरोना रुग्ण, गाव सील करण्यचे आदेश

तहसीलदार यांनी माळूब्रा गाव सील करण्याचे आदेश दिले आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - सध्या राज्यात सर्वत्र कोरोना Corona रुग्ण संख्या घटत असताना आज लातूर Latur जिल्ह्यातील औसा तालुक्यातील माळूब्रा Malumbra गावात 19 कोरोना रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. आज बेलकुंड Belkund येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथक विशेष तपासणी करण्यासाठी दाखल झाले आहे. तर औसा येथील तहसीलदार यांनी माळूब्रा गाव सील करण्याचे आदेश दिले आहे.

हे देखील पहा -

औसा तालुक्यातील माळूब्रा या गावाची लोकसंख्या अंदाजे सहाशे आहे. भूकंपानंतर हे गाव दोन भागात विभागले आहे पश्चिम भाग असलेल्या माळूब्रा या गावातील एक व्यक्ती पीकविमा भरण्यासाठी औसा इथं आला होता दरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता याची अधिक माहिती घेत इतर लोकांची तपासणी केली असता एकूण 18 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आज बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमजद पठाण पथकासह दाखल झाले आहेत.

गावातील इतर नागरिकांची कोरोना चाचणी सुरू असून आज एक व्यक्ती असे एकूण 19 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गावातील काही लोक कामानिमित्त औसा इथं कामासाठी जात असतात त्यातून कोरोनाचा प्रसार झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण यांनी व्यक्त केला आहे.

तर खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार शोभा पुजारी यांनी कोरोना रुग्ण आढळलेल्या माळूब्रा गावाचा भाग सील करण्याचे आदेश दिले आहेत. गावात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एम आर शेख ग्रामसेवक बी एस पाटील व तलाठी निळकंठ जाधव या ठिकाणी दाखल झाले असून गाव सील करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT