सचिन बनसोडे, साम टीव्ही
वय अवघं 17 वर्षं, बारावीचं शिक्षण सुरू... पण समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द मात्र अफाट. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील साईश्रद्धा सालमुठे या विद्यार्थिनीने तयार केलेली एक वेबसाइट लाखो बस प्रवाशांसाठी उपयुक्त ठरती आहे. एका QR कोडच्या माध्यमातून प्रवाशांना बसचे वेळापत्रक आणि बसची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही तीचं कौतुक केलं केलं. सरनाईक यांनी साईश्रद्धाच्या पुढील उच्चशिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली असून तिची थेट परिवहन विभागाची दूत म्हणून नियुक्ती केली आहे. समाजासाठी कार्य करणारी साईश्रद्धा खरी Gen-Z असल्याच सरनाईक यांनी म्हटलंय.
बसस्थानकावर बसची वाट पाहताना अनेकदा प्रवाशांना एकच प्रश्न पडतो. बस कधी येणार? कुठून येणार? आणि पुढची बस किती वाजता आहे? याच सर्वसामान्यांच्या समस्येवर कोपरगावच्या साईश्रद्धा सालमुठे हिने डिजिटल उपाय शोधलाय. इयत्ता 9 वीत असतानाच तिने 2023 मध्ये एक QR कोड विकसित केला. हा QR कोड स्कॅन करताच नगर आणि नाशिक विभागातील बसच्या वेळापत्रकाची माहिती नागरिकांना उपलब्ध होते. तिच्या वेबसाईटला लाखो लोकांनी फॉलो केले असून, लाखो लोक या मोफत वेबसाईटचा लाभ देखील घेत आहेत.
साईश्रद्धाच्या या अभिनव उपक्रमाची दखल थेट राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली. तिच्या वेबसाइटचं कौतुक करत हा उपक्रम राज्यभर लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही, तर साईश्रद्धाला एसटी महामंडळाची दूत म्हणून नियुक्त करण्यासह तिच्या पुढील उच्चशिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणाही परिवहनमंत्र्यांनी केली आहे..
एका QR कोडच्या माध्यमातून बसच्या वेळापत्रकाची माहिती मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासाचं नियोजनही अधिक सोपं होणार आहे. एका छोट्याशा कल्पनेतून सुरू झालेला साईश्रद्धाचा हा प्रवास आता राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.