150 villagers from renapur admitted in general hospital hingoli saam tv
महाराष्ट्र

Hingoli : रेणापूरमध्ये विषबाधा; 150 भाविक हिंगाेली रुग्णालयात दाखल

Hingoli General Hospital News : ज्या ग्रामस्थांना त्रास जाणवत आहे. त्या ग्रामस्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

संदीप नागरे

Hingoli News :

हिंगाेली जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमात प्रसादासाठी तयार करण्यात आलेल्या भगरीतून शेकडाे ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना समाेर आली आहे. हिंगाेली येथील शासकीय रुग्णालयात (hingoli general hospital) सुमारे दीडशे ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून प्राप्त झाली. (Maharashtra News)

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील रेणापूर गावात धार्मिक सप्ताहाच्या कार्यक्रमात शिजविण्यात आलेल्या भगरी मधून दीडशे ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. यामध्ये महिला पुरुष व चिमुकल्यांचा समावेश आहे.

दरम्यान मध्यरात्री व सकाळी सर्व ग्रामस्थांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर हिंगोलीच्या आरोग्य विभागाचे एक पथक देखील रेणापुर गावांमध्ये दाखल झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या ग्रामस्थांना त्रास जाणवत आहे. त्या ग्रामस्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विषबाधा झालेल्या बहुतांश ग्रामस्थांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हिंगाेली शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT