Nashik Flood News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Flood: नदीच्या पुरात अडकले 15 तरुण, लष्करी हेलिकॉप्टरने केली सुटका; पाहा व्हिडिओ

Nashik News: दुथडी भरून वाहणारी नदी, नदीच्या पुरात अडकलेले 15 तरुण आणि त्यांच्या सुटकेसाठी 15 तासांहून जास्त तास चाललेले रेस्क्यू ऑपरेशन, हा सगळा थरार अनुभवला मालेगावच्या सवंदगावाने...

Saam Tv

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मालेगावच्या गिरणा नदीलाही पूर आलाय. यात पुरात 15 मच्छिमार अडकून पडले होते. अखेर लष्कराच्या मदतीने त्यांची सुटका झाली.

मालेगाव आणि धुळ्यातले 15 मासेमार गिरणा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी उतरले होते. मात्र, काही वेळातच पाणी पातळी वाढली त्यामुळे हे तरुण तिथेच अडकून पडले होते.

माहिती मिळताच मालेगाव महापालिकेचं अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं. मात्र, अडकलेल्यांपैकी अनेकांना पोहोता येत नव्हतं. त्यामुळे बचाव मोहिमेला यश येईना. अशातच रात्र गेली. संपूर्ण रात्र हे तरुण जीव मुठीत धरून नदीपात्रातल्या एका खडकावर बसून होते.

सकाळी NDRF ला पाचारण करण्यात आलं. मात्र, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने त्यांनाही अपयश आलं. अखेर लष्कराची मदत घेण्याचं ठरलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला बोलवण्यात आलं. या हेलिकॉप्टरने 3 फेऱ्यांमध्ये सर्व तरुणांना सुखरूप बाहेर काढलं.

मुसळधार पावसात किंवा पुरस्थितीत नदीपात्राजवळ जाऊ नये असं वारंवार आवाहन केलं जातं तरीही अनेकजण धाडस करतात. मात्र अनेकदा हे साहस अंगलट येत. मालेगावच्या तरुणांना मासेमारीची हौस अडचणीत आणली. मात्र वेळीच मदत मिळाल्यानं त्यांची सुटका झाली. यातून सगळ्यांनीच धडा घ्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT