बीडच्या चुंबळी गावात छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या  विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या चुंबळी गावात छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून, 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी या गावामध्ये उघडकीस आली आहे.

विनोद जिरे

बीड : सततच्या छेडछाडीला कंटाळून, 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या चुंबळी गावांमध्ये उघडकीस आली आहे. तर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, मुलीच्या नातेवाईकांसह समाजातील स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.

हे देखील पहा -

चुंबळी येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह, घरात गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे एपीआय महेश आंधळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी नातेवाईकांसह मुस्लिम समाजातील नेत्यांनी, गावातील तरुणाने तिच्यावर अत्याचार करून तिला फासावर लटकवले. असा आरोप केला होता. त्यामुळे मृत मुलीचे शवविच्छेदन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाच डॉक्टरांच्या टीमने केले आहे. मात्र त्यामध्ये काहीच आढळून आले नाही.

तर, याप्रकरणी मुलीच्या पित्याने रात्री पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरातील सर्वजण बाहेरगावी लग्नासाठी गेलो होतो. घरी परतल्यानंतर मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. गावातील एका तरुणाकडून मयत मुलीसह तिच्या बहिणीची वारंवार छेड काढली जात होती. यापूर्वी त्या तरुणाने अश्लील चाळे केल्याने गावातील नागरिकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर तो तरुण मुलीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. या दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी, गावातीलच उमेश क्षीरसागर वय 30 या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कलम 305, पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited BY : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT