Nagpur Crime News saam tv
महाराष्ट्र

Nagpur : बापानेच रचला मुलीच्या अपहरणाचा कट; पाेलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता रचला अपहरणाचा कट

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News - नागपूर (Nagpur) रेल्वे स्थानकातील एक धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 14 महिन्याच्या चिमुरडीला तिच्या पित्याने जबलपूर- अमरावती एक्सप्रेसमध्ये बसवलं. त्यानंतर तिचं अपहरण झालं असल्याचा बनाव रचला. नागपूर रेल्वे स्थानकावर आईचं लक्ष नसताना मुलीला पित्यानं हे कृत्य केलं.

आरोपी हा पत्नी आणि मुलीसह चेन्नई ते रायपूर असा प्रवास करत होता. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता आरोपी असता पित्यानं हा कट रचला. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून बापानेच हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

जेव्हा पत्नीने कृष्णकुमारकडे विचारणा केली तेव्हा एकाने आपल्याला मारहाण करुन जिज्ञासाला पळवून नेल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर दाम्पत्य गावी गेलं. तिथे कुटुंबीयांचा संशय बळावला. अखेर पोलीस तक्रार करण्यासाठी दाम्पत्याने नागपूरचं शांतीनगर पोलीस ठाणं गाठलं.

कृष्णकुमार कोसले असे या आरोपी पित्याचं नाव असून तो मूळचा रायपूर, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी (Police) कृष्णकुमारची चौकशी केली असता तो हडबडला. अखेर पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच कृष्णकुमार याने आपल्या कृत्याची कबुली दिली.

या प्रकरणी पोलिसांकडून 14 महिन्याच्या मुलीचा अजूनही शोध लागलेला नसून पोलीस तिचा शोध घेत आहेत. सध्या या मुलीचा शोध घण्याचं आव्हानं पोलिसांसमोर उभं ठाकल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT