pandharpur news, ganeshotsav 2022, ganpati , liquor , sangola, sangola police saam tv
महाराष्ट्र

Sangloa Ganeshotsav : चर्चा तर हाेणारच ! शहाजी बापूंच्या सांगाेल्यात पाेलिसांची एकदम ओके कारवाई

या कारवाईमुळं अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

भारत नागणे

Pandharpur Ganeshotsav : राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganesh Utsav) धामधूम सुरु आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला शहरात पाेलिसांनी केलेल्या कारवाीत तब्बल चाैदा लाख पन्नास हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणा-यांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान पाेलिसांच्या (police) कारवाईचं नागरिकातून काैतुक हाेत आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला पोलिसांनी अवैध दारू साठा विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 14 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या टॅगो कंपनीच्या सुमारे दाेन हजार दारूच्या (liquor) बाटल्या (२१० बॅक्स) जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर - महूद रोड लगत असलेल्या सांगोला तालुक्यातील गायगव्हाण परिसरातील एका शेतातील शेडमध्ये अवैध‌ दारू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला‌ पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये टॅगो कंपनीच्या दोन हजार दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पंढरपूर येथील शुभम वाघमारे, किरण खिलारे आणि रवि‌ खिलारे या तिघा संशयितां विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT