Shegaon Police Station संजय जाधव
महाराष्ट्र

अवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातीवाईकांची भूमिका

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा - काल शेगाव (Shagaon) तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती. त्याच परिसरात आज पुरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी खोदून ठेवलेल्या खड्डयात पडून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात (Hospital) आणून शेगाव पोलीस स्थानकात चांगलाच हंगामा केला. जो पर्यंत गुन्हा दाखल न नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या दिला.

हे देखील पहा -

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की काल वाळू तस्करांनी तहसीलदांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याच परिसरात पूर्णा नदी पात्रातीलरात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदीपात्रात मोठा खड्डा खोदून त्यातील वाळू चोरून नेल्याने नेहमी प्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंनगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला.

अर्जुन भारसाकळे असे मृत मुलाचे नव आहे. याची तक्रार पोलिसात देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नागरिकांनी व नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरच पोलीस प्रशासन हाय हाय चे नारे देत मोठा गोंधळ घातला. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT