Breaking News  
महाराष्ट्र

अजिंक्य चौकात अपघात; क्रिकेट खेळण्यासाठी चाललेली मुलगी ठार

या घटनेमुळे परिसरात तसेच घटनास्थळी हळहळ व्यक्त हाेत हाेती.

विजय पाटील

Sangli News : सांगली येथील हरिपूर रस्त्यावरील अजिंक्य चौक येथे आज (मंगळवार) ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास संबंधित मुलगी क्रिकेटचे किट घेऊन खेळण्यासाठी सायकलवरून जात होती. यावेळी तिचा तोल गेला आणि ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याची घटनास्थळावरुन माहिती मिळाली.

हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली. यावेळी नागरिकांनी तातडीने अपघाताची माहिती पाेलिसांना दिली. दरम्यान या अपघातात मुलगी जागीच ठार झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त हाेत हाेती.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT