Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मविआचे 12 ते 13 आमदार संपर्कात, शिंदे गटातील बड्या नेत्याने फोडला बॉम्ब!

170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे.

Shivani Tichkule

मुंबई - महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर राज्यात फोडाफोडीच राजकारण सुरू झालं. अशातच चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोटच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे.

तसेच राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले आहे. पत्रकार परिषद बोलताना उदय सामंत यांनी मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे.असा दावाच सामंत यांनी केला.

महाविकास आघडीत काय आलबेल आहे ते आज पुढे आले. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट प्रश्नही उदय सामंत यांनी यावेळी केला आहे.

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, उद्धव ठाकरेंचे भाकित

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता पुन्हा राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. तसेच मध्यावधी निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackreray) बोलविली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकीबाबत वक्तव्य केलं आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT