Crime news update Saam TV
महाराष्ट्र

रिंकू देसाईसह बोंद्रेनगरातील १२ जणांवर लक्ष्मीपुरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साेमवारी रात्री घटना घडल्यानंतर पाेलीसांनी तातडीने तपास सुरु केला.

साम न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : ‘माझा बर्थ डे (birthday) आहे. माझे पोस्टर लाव नाही तर तुझ्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल अशी धमकी देत विजय उर्फ रिंकू देसाई व त्याच्या साथीदारांनी घरात घुसून दोघांवर शस्त्राने हल्ला करून जखमी (injured) केल्याप्रकरणी (kolhapur) लक्ष्मीपुरी पोलिसांनी (laxmipuri police station) १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. (rinku desai latest marathi news)

या तलवार हल्ल्यात कृष्णात बोडेकर आणि संतोष बोडके हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कृष्णात बोडेकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात देसाई व अन्य साथीदारांबाबत मारहाणीची तक्रार दिली.

या तक्रारीनंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी विजय उर्फ रिंकू देसाई (rinku desai) , प्रकाश बोडके, रामचंद्र बोडके, तानाजी फाले, लक्ष्मण येडगे, बाबूराव गावडे, नितीन वरेकर, प्रथमेश जानकर, सागर बोडेकर, तानाजी शेळके, सुनिल बोडके, चंदर बोडके (सर्व राहणार बोंद्रेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

SCROLL FOR NEXT