Drinking water 
महाराष्ट्र

अकोल्यातील ५६ गावांची केंद्र सरकार भागवणार तहान

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत अकोले तालुक्यात ५६ गावांसाठी १०७.९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा सर्व्हे करण्याचे काम टाटा कन्सल्टिंग या संस्थेला दिले आहे. येत्या १५ दिवसांत या कामाचा सर्व्हे होऊन टेंडर होतील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग अकोले उपअभियंता विवेक रोटे यांनी दिली.

अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या राजूर,समशेरपुर ,ब्राह्मण वाडा, गणोरे,एकदरा या विभागासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनद्वारे पिण्यासाठी पाणी देण्याची योजना आहे. समशेरपूर विभागात समशेरपूर, सावरगाव पाट, घोडसर वाडी, घाटाखालची वाडी, फोडसे वाडी,बिबदरा वाडी,फणस वाडी, ढोंणारवाडी, शहाणे वस्ती, नागाची वाडी,घोड्याची वाडी, देवाची वाडी आदी गावासाठी १८.९९ कोटी तर गणोरा व ४ गावासाठी १५.३२ कोटी, अकोले व ३२गावसाठी ३५ कोटी, एकदरा व ४ गावे १२.८१ कोटी, ब्राह्मण वाडा व ३गावे १९.७०कोटी राजूर व २ वाड्यांसाठी ६.१० कोटी तरतूद झाली आहे. त्या दृष्टीने टाटा कन्सल्टन्सीने सर्व्हे करून संबधित विभागाला अहवाल सादर करावयाचा आहे.107 crore for 56 villages in Akola ABN79

समशेरपूर भागासाठी आढळा जलाशयातून ग्राविटीने पाणी देता येणार आहे. राजूर योजनेसाठी पिंपरकणे पुलाजवळ विहीर घेऊन पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती निसर्ग कन्सल्टन्सीचे इंजिनियर वैभव अहिरे यांनी दिली. तर एक एकर क्षेत्रात याच निधीतून सोलर प्लांट बसवून त्यातून निर्माण होणारी वीज वीज मंडळाला देऊन वीज मंडळाकडून वीज घेतली जाणार आहे. त्यामुळे वीज बिल या योजनेला अल्प प्रमाणात लागणार आहे. राजूर गावाला व सलग्न वाड्यांना रोज पाणी मिळणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले. माजी सरपंच हेमलता पिचड यांनी ही नवीन योजना येण्यासाठी पाठपुरावा केला होता.107 crore for 56 villages in Akola ABN79

केंद्र सरकारच्या जळजीवन मिशन योजनेतून तालुक्यांतील किमान ५६ गावांना नळाद्वारे पाणी देण्याची बहुउद्देशीय योजना आहे. या योजनेमुळे आदिवासी दुर्गम भागातील जनतेला पाणी मिळणार आहे. स्थानिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

- वैभव पिचड, माजी आमदार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT