10 year old girl fights crocodile to save mother in Ratnagiri saam tv
महाराष्ट्र

मगरीच्या हल्ल्याचा थरार, आईसाठी मुलगी थेट मगरीशी भिडली

Daughter’s Brave Fight with Crocodile: आईचा जीव वाचवण्यासाठी लेक थेट मगरीशी भिडलीय..मात्र ही घटना नेमकी कुठे घडली? मगरीनं हल्ला केला तेव्हा नेमकं काय घडलं...पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे 10 वर्षांच्या चिमुकलीनं आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी चक्क मगरीशी दोन हात केलेत. या धाडसी मुलीचे नाव स्वर्णी पवार असून, तिच्या प्रसंगावधानामुळे आईचा जीव वाचलाय...

नंदिनी पवार या वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या... त्यावेळी त्याच्यावर मगरीनं हल्ला केला... नंदिना यांचा पाय पकडून मगर त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती...प्रसंग बाका होता. मात्र स्वर्णी घाबरली नाही, तिनं धाडस दाखवत आईला पूर्ण ताकदीनिशी बाहेर ओढलं...ज्यामुळे आईचा जीव वाचलाय...नेमकं काय झालं...ऐका...

या हल्ल्यात नंदिनी पवार जखमी झाल्यात...कामथे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत...मात्र 10 वर्षांच्या मुलीने दाखवलेले हे धाडस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरले असून, स्वर्णीच्या या प्रसंगावधानाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय...मात्र वाशिष्ठी नदीच्या परिसरात याआधीही मगरींचे वावर पाहायला मिळालाय.. त्यामुळे या घटनेमुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होतोय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात 2027 मध्ये कमी पाऊस, 100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती

I Phone चे हप्ते थकले, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

हॉस्टेलवाले प्रेगन्सी टेस्ट करायला लावतात; आदिवासी मुलीने सांगितली हॉस्टेलमधील धक्कादायक बाब

नोकरीचं स्वप्न दाखवलं, लॉजमध्ये डांबलं! शिरूरमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! शिक्षण ते नोकरीपर्यंत मिळणार 50 कोटींची मदत

SCROLL FOR NEXT