Washim Crime गजानन भोयर
महाराष्ट्र

निर्दयीपणाचा कळस! 1 वर्षाच्या चिमुकलीला बापाने जिवंत पुरले

सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा आणि यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची.

गजानन भोयर

वाशिम - एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरल्याची घटना काल संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सुरेश घुगे असे निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी (Police) त्यास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत शेतातील गोठ्यावर राहत होता. पती-पत्नींना तीन मुली असून, सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची.

हे देखील पहा -

सुरेशला दारूचे व्यसन असल्याने, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी दिराला हकिकत सांगितली. गावातील नागरिक शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली असता ही हकीकत त्याने स्वतः सांगितली. याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून, आरोपी निर्दयी पिता सुरेश यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT