Accident Saam tv
महाराष्ट्र

लातूरच्या दगडवाडी येथे कारच्या धडकेत 1 जण ठार

रविवारी सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडला

दीपक क्षीरसागर

लातूर - दगडवाडी येथे रस्त्यावरील पुलाच्या कठड्यावर बसलेल्या दोन तरुणांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी अहमदपूर शहरातील 21 वर्षीय वसीम याकुब शेख रा. फत्तेपूर गल्ली याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

वसीम याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालवली. गाडी दगडवाडी पुलाजवळ येताच त्याचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे त्याने त्याच्याविरुद्ध दिशेच्या पुलावरील पहील्या कठड्याच्या बाहेर बसलेला दगडवाडी येथील मुकींद रामराव मुंढे याच्या अंगावरून गाडी घातली.

या अपघातामुळे त्याच्या शरिरावर ठिकठिकाणी गंभीर मार लागला व त्याचा मृत्यू झाला. तर त्याच ठिकाणी असणारा प्रतिक पांडूरंग मुंढे याला दोन्ही पायाला गंभीर इजा झाली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT