Yugendra Pawar Vs Ajit Pawar  Yugendra Pawar Vs Ajit Pawar
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : युगेंद्र पवारांचा अजितदादांवर पहिला हल्लाबोल, म्हणाले आजीला राजकारणात आणायचं नाही

Yugendra Pawar Vs Ajit Pawar : बारामतीमध्ये काका आणि पुतण्यामध्ये सामना होत आहे. नातवासाठी काका शरद पवार मैदानात उतरलेत.

Namdeo Kumbhar

बारमतीच्या मैदानात पुन्हा एकदा पवार कुटुंबात लढत होत आहे. लोकसभेला नणंद भावजय यांच्यामध्ये आमनासामना झाला होता. आता काका आणि पुतण्यामध्ये थेट लढत होत आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये विधानसभेची लढत होत आहे. सोमवारी दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर सभेत बोलताना अजित पवार भावनिक झाले होते. युगेंद्र पवार यांना उभं करु नका, असे आईने सांगतले होते.. असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. याला आता युगेंद्र पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय.

बारमातीच्या मैदानात अनुभवी अजित पवार यांच्यासमोर नवख्या युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे. भाषणामध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका लागली आहे. पवार कुटुंबात आईवरुन दावे -प्रतिदावे केल्याचे पाहायला मिळत आहेत. आईने युगेंद्रला उभं करू नका असे सांगितले होते. पण कुणीही ऐकलं नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी सोमवारी जाहीर सभेत केले होते. याला आता युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार यांनी उत्तर दिले. आजीसोबत माझं भावनिक नातं आहे, त्यांना राजकारणात आणायचं नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले. तर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही आईला मध्ये आणू नका, असे म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

Drinking water before bed: झोपण्याआधी किती तास आधी आणि किती पाणी प्यावं? फायदे-तोटे जाणून घ्या

CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

Khaja Recipe: सणासुदीला घरच्या घरी कुरकुरीत आणि गोड खाजा करा तयार, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT