Devendra Fadnavis saam Tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध; देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला नोमानींचा ऑडिओ

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा धार्मिक धृवीकरणावर येऊन ठेवलाय. तर लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. त्यावरून राजकारण तापलंय...त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार धार्मिक मुद्द्याभोवती फिरायला सुरुवात झालीय.. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी सज्जाद नोमाणींनी महाविकास आघाडीसाठी व्होट जिहाद करण्याचा फतवा काढल्याचा दावा करणारा ऑडिओ फडणवीसांनी पुण्यातील सभेत ऐकवला. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध करा, असं आवाहन फडणवीसांनी केलंय. तर पुण्यातील काही लोकं फक्त भाजपलाच मतदान करतात, त्याला व्होट जिहाद म्हणायचं का? असा पलटवार पवारांनी केलाय

लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे 14 मतदारसंघात महायुतीला फटका बसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय.. तर फडणवीसांनी व्होट जिहादचं गणितच मांडलंय.

फडणवीसांचं धुळ्यातलं व्होट जिहादचं गणित

5 विधानसभा मतदारसंघात सुभाष भामरे 1 लाख 90 हजार मतांनी आघाडीवर

एकट्या मालेगाव मध्यमधून शोभा बच्छाव यांना 1 लाख 94 हजार मतांचं लीड

अखेर सुभाष भामरेंचा 3 हजार 831 मतांनी पराभव

लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतं भाजपपासून दुरावल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपने आक्रमक प्रचार करत बटेंगे तो कटेंगे नारा दिलाय. मात्र राज्यात 32 विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक मतांचा प्रभाव आहे. त्यामुळे मतदार मतांचं धर्मयुद्ध करणार की लोकसभेप्रमाणे धार्मिक धृवीकरणाविरोधात मतदान करणार? यावर सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT