Ajit Pawar Speech  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: 'लोकसभेला साहेबांना केलं, आता मला खूश करा'; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

Assembly Election: बारामतीत अजित पवारांच्या विरोधात पुतण्या युगेंद्र पवारांनी मोठं आव्हान उभं केलंय. त्यापार्श्वभुमीवर अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलंय.. त्यावरून राजकारण तापलंय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

बारामतीत विधानसभा निवडणूक रंगात आलीय. बारामतीत अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार असा थेट संघर्ष रंगलाय. त्यापार्श्वभुमीवर अजित पवारांनी बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. यावेळी बोलताना लोकसभेला शरद पवारांना खूश करण्यासाठी सुप्रिया सुळेंना मतदान केलं. तर आता विधानसभेला मला खूश करा, असं आवाहनच अजित पवारांनी केलंय.

विधानसभेला आपल्याला खूश करण्याचं आवाहन केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी दादांना बारामती सोपी राहिली नसल्याचा टोला लगावलाय. तर विधानसभेचा निकाल विरोधकांची तोंडं बंद करील, असा पलटवार भुजबळांनी व्यक्त केलाय.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. एवढंच नाही तर अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तब्बल 48 हजार मतांचं लीड मिळालं. त्यामुळे अस्वस्थ झालेले अजित पवार आता भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. बारामतीकरांनी लोकसभेला अजित पवारांचे काका शरद पवारांना साथ दिली. मात्र आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या लढत असल्याने बारामतीकर युगेंद्र पवारांच्या काकाला खूश करणार की नव्या दमाचा पुतण्या युगेंद्रला संधी देणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT