Maharashtra Assembly Elections

Assembly Election: विधानसभेत रंगणार काका-पुतण्याची लढाई; बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार थोपटणार दंड

Baramati Assembly Election: बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार ? पहिल्या यादीत बारामतीचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

लोकसभेप्रमाणेच अख्या राज्याचं लक्ष बारामतीकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे एकाच कुटुंबातील सदस्य आमनसामने आले होते. त्याचप्रमाणे आता विधानसभेत आता काका-पुतणे एकमेकांविरोधात दंड थोपटणार आहेत. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे बारामतीचे उमेदवार असणार असल्याचं निश्चित झालंय.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी नणंद-भावजयमध्ये म्हणजेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढाई पाहायला मिळाली होती. या लढतीमुळे अख्या देशाचं लक्ष बारामती निवडणुकीकडे लागलं होतं. आता काका पुतणे आमनेसामने आले आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर महायुतीकडून अजित पवार हेच उमेदवार असणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार आपल्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान अजित पवार बारामतीतून लढणार की शिरूरमधून अशा चर्चा देखील सुरू होत्या. लोकसभेप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये पवारविरूध्द पवार अशी लढत होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशा चर्चा सरू होत्या. त्या चर्चांवर प्रफुल पटेलांनी पडदा टाकला आणि अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT