Maharashtra politics news today Saamtv
Maharashtra Assembly Elections

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर, खासदार-आमदारांना महत्वाच्या सूचना, मातोश्रीवरील बैठकीत काय काय झालं?

Maharashtra politics news today : आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा, आशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना आणि आमदारांना दिल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Shiv Sena : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra politics news today) पार्शभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज मातोश्रीवर राज्यातील शिवसेना आमदार-खासदार आणि नेत्यांची आढावा बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आशा सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय आपला कोणता नेता सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहे का? याचीही चाचपणी करण्यास नेत्यांना सांगितलेय. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीला आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. विनायक राऊत, दत्ता दळवी, सुभाष देसाई, अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, ओम राजे निंबाळकर आणि विविध भागातील नगरसेवक, पदाधिकारी मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

तयारीला लागा, ठाकरेंच्या खासदार-आमदारांना सूचना -

आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा, आशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना आणि आमदारांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत ज्या चुका झाल्या असतील त्या चुका विधानसभेत होऊ नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

विधानसभेत मशाल जास्तीत जास्त घरो-घरी कशी पोहोचवता येईल, याची देखील चर्चा आजच्या बैठकीत झाली.येत्या 16 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.. त्यासाठी देखील तयारी लागण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर, सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात कुणी आहे का? घेतला आढावा -

उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी आज मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत सावध पवित्रा घेतला. त्याशिवाय प्रत्येक संपर्क प्रमुखांना तालुका निहाय्याद्या याद्या दिल्या आहेत.

तालुका निहाय याद्यांमध्ये, स्थानिक गटप्रमुखांपासून ते ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची संपूर्ण इत्यंभूत माहिती व हालचालींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

या गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेण्याच्या ठाकरेंकडून संपर्कप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शिंदेच्या शिवसेनेसोबत आपला कोणता पदाधिकारी संपर्कात आहे का? याची देखील चाचपणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

Maharashtra Live News Update: हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share Market Crash: अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 2500 अकांनी घसरला

SCROLL FOR NEXT