Maharashtra Politics  
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: मुलांसाठी ठाकरे एकत्र? माहीममध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नाही?

Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी येतेय साम टीव्हीवर अमित ठाकरे दादर-माहिममधून लढणार असल्याची माहिती समोर आलीय.

Tanmay Tillu

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे हे रिंगणात उतरणार आहेत.अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित मानलं जातंय.

अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित ठाकरे याला पाठिंबाचा देण्यात तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी देखील मनसे उमेदवार देणार नाही अशा हालचाली सुरूए. त्यामुळे भावी पिढीसाठी ठाकरे बंधु एकत्र येताना दिसतायत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानंतर आता अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

अमित ठाकरे दादर- माहिम मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता

ठाकरे गट अमितविरोधात उमेदवार न देण्याची शक्यता

वरळीत मनसे आदित्यविरोधात उमेदवार देणार नसल्याची चिन्ह

मुलांसाठी ठाकरे बंधुंमध्ये निवडणुकीसाठी समझोता?

अमित ठाकरेंच्या पॉलिटिकल डेब्यूसाठी उद्धव काकांचं सहकार्य?

दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनीही अमित ठाकरेंच्या नावाच्या चर्चेचं स्वागत केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT