Maharashtra Politics Maharashtra Politics
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : उमेदवारी मागे का घेतली? लातूरमध्ये वचिंत-ठाकरे गटात राडा, पोलिसांसमोरच हाणामारी|VIDEO

Maharashtra Election : औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत. औसामधून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर जोरदार राडा झाला.

Namdeo Kumbhar

Maharashtra Election : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, बंडखोरांनी अनेक ठिकाणावरुन उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन लातूरमधील औसा येथे राडा झालाय. ठाकरे गट आणि वंचित यांच्यामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. पोलिसांसमोरच दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. याचा प्रसंगाचा व्हिडीओ समोर आलाय. औसा विधानसभेत संतोष सोमवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज अचानक उमेदवारी अर्ज त्यांनी माघारी घेतला. त्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी केली. संतोष सोमवंशी यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज भरला होता. पण संतोष सोमवंशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मध्यस्थीने संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. तर औसा विधानसभेत ठाकरे गटाचे उमेदवार दिनकर माने यांना संतोष सोमवंशी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. पण उमेदवारी माघारी घेतल्यानंतर ठाकरे आणि वंचितचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांसमोर हाणामारी झाली.

संतोष सोमवंशी यांनी कधीही शिवसेनेच्या विरोधात कुठलही काम केलेलं नाही. ते कायम शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा देखील एक राजकीय भागच असू शकतो. राजकारण फक्त अभिमन्यू पवारांनाच येतं आणि ते शिवसेनेला येत नाही, असं काही समजायचं कारण नाही. संतोष सोमवंशी यांची प्रत्येक कृती ही दिनकर माने यांच्यासाठीच होती. अशा प्रकारची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दुसरीकडे वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करुन अचानक माघार घेतल्याने वंचितचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. यावेळी वंचितचे कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT