अजित पवार Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Vadgaon Sheri : अजित पवारांकडून सुनील टिंगरेंना उमेदवारी, भाजपच्या जगदीश मुळीक यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

Vidhan Sabha : महायुतीमध्ये वडगाव शेरी मतदारसंघावरुन दावे-प्रतिदावे अद्याप सुरु आहेत.

Namdeo Kumbhar

Vadgaon Sheri Assembly constituency: अजित पवार यांनी सात उमेदवारांची दुसरी यादी आज जारी केली. त्यानंतर वडगाव शेरी येथील सस्पेन्स संपला. वडगाव शेरी मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार यांच्याकडे गेला आहे. त्यांनी याजागेवर सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे. पण वडगाव शेरीमधील तिढा सुटलेला नाही. भाजपचे नाराज जगदीश मुळीक यांना अद्याप उमेदवारीची आशा आहे. त्यांनी साम टीव्हीशी बोलताना याबाबत दावा केला.

वडगाव शेरीची जागा घोषित झाल्यानंतर महायुतीत सस्पेन्स कायम आहे. वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादीने घोषित केले असले तरी अजून विषय संपलेला नाही, असे वक्तव्य जगदीश मुळीक यांनी केले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही जागा लढणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्ज भरायला अजून तीन ते चार दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व आम्हाला न्याय देईल, असेही मुळीक म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये वडगाव शेरी मतदारसंघ कुणाला जाणार? याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT