Vinod Tawde diary 
Maharashtra Assembly Elections

Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय-काय मिळालं?

Vinod Tawde : विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप केला जात आहे. विनोद तावडे हे विरार येथील हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी राज्यातील राजकारणात मोठी धक्कायदक घटना घडलीय. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडालीय. विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला.

विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले होते, असा मोठा आरोप बविआने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळालीय. त्याचबरोबर अनेक डायऱ्या मिळाल्यात. या डायऱ्यांमध्ये व्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केलाय. विनोद तावडे यांच्या डायरीमध्ये अजून काय काय मिळून आले आहे. याची माहिती घेऊ.

डायरीत काय?

हाती आलेल्या माहितीनुसार,या डायरीत साधरण १५ ते २० महिलांची नावे आहेत. या नावे असून त्याच्यासमोर काही अंक लिहिण्यात आली आहेत. हे देण्यात आलेले पैसे असल्याचं म्हटलं जात आहे.

काय म्हणाले विनोद तावडे?

विरारमधून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय असतात, ते सांगायला आलो होतो. आमच्या समोरच्या मित्र पक्षाला वाटलं की, मी पैसे वाटायला आलो आहे. मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, मी काही चुकीचं केलं नाहीये. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कट रचला असल्याचा आरोप विनोद तावडेंनी आपल्या स्पष्टीकरणात केलाय. हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांच्यासोबतही चर्चा झाली. त्यामुळे पैसे वाटप होत असेल, तर पोलीस, निवडणूक आयोग, सीसीटीव्ही फुटेज सर्व आहेत, असे तावडे म्हणालेत.

'महायुतीचा नोट जिहाद'; उद्धव ठाकरे

हा तर महायुतीचा नोट जिहाद आहे. मी आज तुळजापूरला दर्शनासाठी गेलेलो माझी पण बॅग आज तपासण्यात आली. काल नाशिक आज विनोद तावडेंकडे पैसे सापडले अशा बातम्या येताहेत. अनिल देशमुखांवर जो दगड मारला तो कोणी शोधायचा? निवडणूक आयोगाने!' 'माझ्याकडे कुठला पुरावा नाही. पण ज्या बातम्या येत आहेत, त्यानुसार तो "वोट जिहाद" आहे. निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT