Shekap Jayant patil saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : शेकापचे ५ उमेदवार जाहीर, 'मविआ'बद्दलच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

shetkari kamgar paksh candidate in Raigad : शेतकरी कामगार पक्षाने रायगडमधील चार मतदारसंघातील उमेदवार घोषित करतानाच, सांगोला येथील संभाव्य उमेदवाराचं नावही जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

Saam Tv

सचिन कदम, अलिबाग, साम टीव्ही

Shekap candidate List : शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर सरचिटणीस जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आम्ही प्रागतिक आघाडी म्हणून लढत आहोत. आम्ही आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पण त्या प्रकारचे कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

रायगडमधील अलिबाग मतदारसंघातून चित्रलेखा पाटील, पनवेल येथून बाळाराम पाटील, उरणमधून प्रितम पाटील, पेण मतदारसंघात अतुल म्हात्रे आणि नांदेडमधील लोहा खंदार येथून शामसुंदर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन-तीन उमेदवारांची मागणी आहे. कोणताही वाद नाही. वातावरण आज युतीच्या विरोधात असून त्याला गालबोट लावणारे कृत्य आमच्याकडून होणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार शेकापसोबत

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी सांगितलं की मी स्वतः सांगोल्यामध्ये शेकापसोबत आहे. त्यामुळे शेकापला जागा मिळणार आहे. हे रडगाणं चार तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगोल्याचा संभाव्य उमेदवारही जाहीर केला. बाबासाहेब देशमुख यांचं नाव जयंत पाटील यांनी संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर केलं.

शेकापमधून आतापर्यंत कुणाकुणाला उमेदवारी?

रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात चित्रलेखा पाटील या शेकापच्या उमेदवार असतील. तर पनवेल मतदारसंघ - बाळाराम पाटील, उरण - प्रितम पाटील, पेण - अतुल म्हात्रे आणि लोहा खंदार विधानसभा मतदारसंघात शामसुंदर शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सांगोल्यात संभाव्य उमेदवार म्हणून बाबासाहेब देशमुख असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT