Sharad Pawar Saam tv
Maharashtra Assembly Elections

Sharad Pawar : मी घरी बसणारा नाही; विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी सांगितला पुढील प्लान

Sharad Pawar News : शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा प्लान सांगितला आहे.

संभाजी थोरात

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४६ आमदार निवडणून आले आहेत. दुसरीकडे महायुतीचे तब्बल २३० आमदार निवडून आले आहेत. राज्यात महायुतीची त्सुनामी विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पाहायला मिळाली. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यानंतर यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला अवघ्या १० आमदारांवर समाधान मानावे लागलं आहे. महाविकास आघाडीच्या या पीछेहाटीनंतर शरद पवार यांनी पुढील रणनीती सांगितली आहे.

शरद पवार यांची साताऱ्यातील कराडमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी निवडणुकीनंतरचं प्लानिंग सांगितलं. शरद पवार म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. त्यानंतर आज मी कराडमध्ये आहे. या निकालानंतर एखादा घरी बसला असला असता. पण मी घरी बसणारा नाही. आमच्या तरुण पिढीला असा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. खरंतर आता त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना आता पुन्हा उभं करणे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभं करणे हा माझा कार्यक्रम राहील'.

साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर बोलताना शरद पवार म्हणाले, 'मला सोडून गेलेले पडतात, मी आधी देखील बोललो होतो. मात्र या निवडणुकीत तसं पहायला मिळालं नाही. आमच्यातून बाहेर गेलेले लोक लढले आणि निवडून आले. त्यांनी भाजप बरोबर घरोबा केला. पण यशवंत चव्हाण साहेबांनी कधी भाजपचे विचार धरले नाहीत'.

बारामतीतील निकालावर पवार काय म्हणाले?

बारामतीतील हायव्हॉल्टेज लढाईवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'युगेंद्र पवार आणि अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही. पण बारामतीत उमेदवार दिला नसता तर राज्यात काय संदेश गेला असता. आम्हाला आधीच माहिती होतं, कारण अजित पवार यांनी बारामतीत खूप काम केलं आहे'.

विरोधी पक्षनेतेपदावर शरद पवार म्हणाले, 'विरोधी पक्षनेता असेल असा आकडा आमच्याकडे नाही. विरोधीपक्ष नेता असणं कधीही चांगलं असतं. मात्र, विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हे सरकार ठरवेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT