Maharashtra Assembly Elections

Assembly Election: मविआमध्ये तिढा, शरद पवार गट अन् समाजवादी पक्ष आमने-सामने, दोन्ही पक्षाचा एकाच वेळी २ जागांवर दावा!

Assembly Election: समाजवादी पार्टी आणि शरद पवार गट दोन मतदारसंघावरून आमाने-सामने आले आहेत.

Bharat Jadhav

सुनिल काळे, साम प्रतिनिधी

राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५० जागांबाबत मविआत सहमती झालीय. त्याचवेळी भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघावरून शरद पवार गट अन् समाजवादी पक्ष आमने-सामने आलेत.

भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय. समाजवादी पक्षाच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने नकार दिलाय. त्यामुळे आता सपा काय निर्णय घेणार पाहाणं औत्सुक्याचं ठरत आहे. विशेष म्हणेज सध्या या मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

सपाने मागितलेल्या दोन्ही मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नकार दिलाय. दरम्यान २०१९ साली भिवंडी पूर्व विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोट्यातून समाजवादी पक्षाने लढवली होती. मात्र यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा आणि अणुशक्तीनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढण्यास ठाम आहेत. अणुशक्तीनगर विधानसभेचा जो कोणी उमेदवार असेल तो तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावरच लढेल, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पवित्रा घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

SCROLL FOR NEXT