Sharad Pawar  Saamtv
Maharashtra Assembly Elections

Sharad Pawar: सगळ्यांचा नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका, पवारांचं महायुतीला आव्हान

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि स्वतः शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूरच्या माढ्यात शरद पवार यांची तोफ धडाडली.

Bharat Jadhav

मी आता सात वेळा लोकसभा राज्यसभा निवडणूका लढवल्या. परदेशात गेल्यानंतर पक्षातील लोक दुसऱ्या पक्षात गेले. मी महाराष्ट्र पिंजून काढला नवीन दमाचे चेहरे निवडून आणले. त्यामुळे साध सुधे पाडायचे नाही. सगळ्याचा नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका, असं म्हणत पंढरपूरमधून शरद पवार यांनी महायुतीला चॅलेज दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि स्वतः शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूरच्या माढ्यात शरद पवार यांची सभा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. शरद पवार यांची साथ सोडून महायुतीच्या गोटात सामील झालेल्या आमदार बबन शिंदे यांच्यावर पवारांनी हल्लाबोल केला.

आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अभिजीत पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांच्या काँटे की टक्कर अशी लढत होतेय.शरद पवारांनी अभिजीत पाटील यांच्या वडिलांवर म्हणजेच आमदार बबन शिंदे यांच्या जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभेतील यशामुळे महाराष्ट्रातील खासदारांमुळे संसदेत ताकद वाढली असल्याचं शरद पवार म्हणालेत. महायुतीवर टीका करताना शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. तीन वर्षात युती सरकारच्या काळात महिलांवर अन्याय अत्याचार झाले. तीन वर्षात 47 हजार महिलांवर अत्याचार झाले. महिलांना कोणी पळवले यांची माहिती नाही. राज्यातील तरुणांना नोकरी नाही हजारो मुलं नोकरीसाठी फिरतायत.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार म्हणाले, राज्यातील शेतकर्यांची अवस्था गंभीर झाली. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोदी सरकारने उद्योगपतींचे १६ हजार कोटींची कर्जमाफी केली मात्र शेतकऱ्यांना कर्जामुळे आत्महत्या करावी लागत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आमदार बबन शिंदे हे अजित पवार गटासोबत गेले आहेत. त्यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, माझा खासदार निधी वापरण्याचे अधिकार बबन शिंदे यांना दिला.

माढ्याचा गडी कुठे गेला हे पत्ता लागला नाही. पण ते ईडीच्या भीतीने पळून गेले. ज्याचे हात स्वच्छ आहेत, त्यांना कोणाच्या बापाची भिती नसते. मला राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात नोटीस दिली होती. परंतु ईडीची नोटीस दिली ही चूक झाली, असे ईडीचे अधिकारी म्हणाले होते, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT