Hingoli saam tv
Maharashtra Assembly Elections

Exit Poll Maharashtra : हिंगोलीतून तानाजी मुटकुळे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll : हिंगोलीमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. हिंगोलीमधून भाजपाचे तानाजी मुटकुळे यांना तिकीट देण्यात आलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

२० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीचा निकाल २३ तारखेला म्हणजेच शनिवारी लागणार आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोणाचा उमेदवार पडणार? हे समजणार आहे. अशातच साम-सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

हिंगोलीमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. हिंगोलीमधून भाजपाचे तानाजी मुटकुळे यांना तिकीट देण्यात आलं होतं. तर शिवसेना ठाकरे गटाकडून रूपाली गोरेगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यामध्ये भाजपचं पारड जड असल्याची माहिती आहे.

यंदाच्या वेळी विधान सभा मतदानासाठी मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसून आलं. या मतदार संघात प्रमुख ४ उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भाजप विरूद्ध मशाल अशी लढत पाहायला मिळतेय. भाजप विरूद्ध ठाकरे या लढतीत भाजपचं पारड जड असल्याची माहिती आहे. त्यामुळे संभाव्य आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडे पाहण्यात येतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT