Pune Assembly Elections Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : खेळाडू जुने, सामना नवा; पुण्यातील २१ मतदारसंघाचे चित्र स्पष्ट, बंडखोरांमुळे कुणाचा गेम होणार?

Pune Election News: पुण्यातील २१ मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले, यंदा बंडखोरमुळे कुणाचा गेम होणार? याची राज्यात चर्चा सुरु आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या लढती आता निश्चित झाल्या आहेत. सोमवारी काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, पण काही उमेदवार बंडखोरीवर ठाम राहिलेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार, हे निश्चित झालेय. पुण्यातील २१ मतदारसंघाच्या लढती सोमवारी निश्चित झाल्या. पुण्यातील बहुतांश मतदारसंघात खेळाडू जुने, सामने नवीन अशी परिस्थिती झाली आहे.

पुण्यातील अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे. हडपसर, वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तर बहुचर्चित कसबा मध्ये दोन जुने प्रतिस्पर्धी समोरासमोर आहेत. शहरातील अनेक ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडीचे उमेदवारांसह बंडखोर मैदानात आहेत. पुण्यात महायुतीला बंडखोरी मोडण्यात यश आले, पण मविआच्या बंडखोरांनी अर्ज मागे घेतला नाही. पुण्यातील २१ मतदारसंघात कुणासमोर कुणाचं आव्हान? कोण जिंकणार? बंडखोरामुळे कुणाला फटका बसणार? हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट, कुणाविरोधात कोण लढणार?

कसबा

आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस

हेमंत रासने,भाजप

गणेश भोकरे,मनसे

कमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर

छत्रपती शिवाजीनगर

आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजप

दत्ता बहिरट, काँग्रेस

काँग्रेस बंडखोर मनीषा आनंद अपक्ष निवडणूक लढवणार

कोथरूड

आमदार चंद्रकांतदादा पाटील,भाजप

चंद्रकांत मोकाटे,उबाठा शिवसेना

किशोर शिंदे,मनसे

खडकवासला

आमदार भीमराव तापकीर, भाजप

सचिन दोडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

मयुरेश वांजळे,मनसे

हडपसर

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

साईनाथ बाबर, मनसे

वडगावशेरी

आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

पर्वती

आमदार माधुरी मिसाळ,भाजप

अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

आबा बागुल, काँग्रेस बंडखोर अपक्ष निवडणूक लढवणार

सचिन तावरे,बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

कॅन्टोन्मेंट

आमदार सुनील कांबळे,भाजप

रमेश बागवे,काँग्रेस

इंदापूर

हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रवीण माने अपक्ष बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

बारामती

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

अभिजीत बिचुकले,अपक्ष

पुरंदर

संजय जगताप काँग्रेस

विजय शिवतारे शिवसेना

संभाजीराव झेंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

भोर वेल्हा मुळशी

संग्राम थोपटे,काँग्रेस

शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

किरण दगडे पाटील बंडखोर भाजप

कुलदीप कोंडे शिवसेना बंडखोर

मावळ

सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब भेगडे,अपक्ष

खेड आळंदी

दिलीप मोहिते पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बाबाजी काळे,शिवसेना उबाठा

आंबेगाव

दिलीप वसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

देवदत्त निकम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

जुन्नर

अतुल बेनके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सत्यशील शेरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार

आशा बुचके,अपक्ष,भाजप बंडखोर

शरद सोनवणे,अपक्ष,शिवसेना

शिरूर हवेली

अशोक पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

माऊली कटके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

दौंड

राहुल कुल,भाजप

रमेशआप्पा थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

पिंपरी

अण्णा बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सुलक्षणा शीलवंत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

चिंचवड

शंकर जगताप,भाजप

राहुल कलाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

भोसरी

महेश लांडगे,भाजप

अजित गव्हाणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT