Chandrakant Patil Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Pune Vidhan Sabha : कोथरुडमध्ये महायुतीत बिघाडी, चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीमधून आव्हान!

kothrud vidhan sabha : कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून विरोध दर्शवला जात आहे.

Namdeo Kumbhar

Pune News : पुण्यात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. कोथरुडमधील जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कोथरुडमध्ये सध्या भाजपचे चंद्रकांतदादा पाटील आमदार आहेत. या जागेवर आता राष्ट्रवादीच्या विजय डाकले यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे कोथरुडमध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष विजय डाकले यांनी आज कोथरुड मधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना डाकले म्हणाले की, "मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. परंतु नंतर माघार घेण्यास सांगितले. तसेच सध्या कोथरूडमध्ये रस्ते , कचरा वाहतूक सह अनेक प्रश्न तसेच आहेत."

कोथरुडमध्ये सतत वेळ देणारा आमदार हवा अशी कोथरुडकरांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कार्यकर्त्यांच्या भावना कळवल्या आहेत, असेही डाकले यांनी सांगितले.

महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता

कोथरुड मतदारसंघात राष्ट्रवादी तसेच इतर पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडणूक लढण्यादाठी आग्रह करित असल्याचे डाकले यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यातच विजय डाकले यांनी फेसबुक लाईव्ह करीत आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी कोथरुड मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रम राबवण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. आता भाजप आणि चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात? अजित पवार वेगळा निर्णय घेणार का? याची चर्चा कोथरुडमध्ये सुरु आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

हडपसर भागात शिवसेनेचे फ्लेक्स

"हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेचाच" असा मजकूर या फ्लेक्स वर लिहण्यात आला आहे

शिवसेना शहर प्रमुख नाना भानघिरे यांचा सुद्धा त्यावर फोटो लावण्यात आला आहे

सध्या महायुती मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे

चेतन तुपे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

SCROLL FOR NEXT