Manoj Jarange Patil 
Maharashtra Assembly Elections

Manoj jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, उमेदवार अन् मतदारसंघ जाहीर करणार!

Manoj jarange patil vidhan sabha election : मनोज जरांगे पाटील आज उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. सायंकाळी पाच वाजेदरम्यान मनोज जरांगे पाटील घोषणा करणार आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

जालना : लढायचं की पाडायचं, कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार, याबाबत मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याबाबत पावलेही टाकली आहेत. त्यासाठी त्यांनी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितलेय. आज त्याबाबत निर्णय होणार आहे. मनोज जरांगे पाटील आज उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. सायंकाळी पाच वाजेदरम्यान मनोज जरांगे पाटील याबाबतची घोषणा करणार आहेत.

इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी सकाळी सात वाजल्यापासून अंतरवाली सराटीमध्ये ते इच्छुक उमेदवारांशी संवाद देखील साधणार आहे. मनोज जरांगे पाटील किती मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करतात आणि कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम ,दलित असे एकत्रित समीकरण जुळवत, ठराविक जागेवर आपण उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील आपल्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची घोषणा करणार आहेत, तत्पूर्वी अनेक मतदारसंघात इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याने ते सकाळी सर्वच इच्छुक अशा उमेदवारांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, कोणत्या मतदारसंघात आपला उमेदवार देतात.. याकडे राज्याचे लक्ष लागलेय. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायामुळे विधानसभा निवडणुकीला वेगळे वळण लागणार आहे.

इच्छुकांची नाराजी रोखण्याचा जरांगे समोर आव्हान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 14 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे.सत्तेत गेल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान जरांगे यांनी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांनी अर्ज दाखल करावे अशी भूमिका घेतली होती त्यामुळे मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुकांनी आपले अर्ज देखील दाखल केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांना एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासमोर इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याच आव्हान असणार आहे...

एम एम डी फॅक्टर यशस्वी होणार का.?

मराठा, मुस्लिम,दलित यांची मोट बांधून मनोज जरांगे पाटील या विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. आंबेडकरी चळवळीतील आनंदराज आंबेडकर ,राजरत्न आंबेडकर त्याचबरोबर मुस्लिम धर्मगुरू सय्याद नोमानी यांच्यासोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेऊन मराठा, मुस्लिम, दलित या समीकरणाची घोषणा केलेली आहे. दरम्यान महाराष्ट्रात हा एम एम डी फॅक्टर यशस्वी होणार का हे बघणं देखील महत्त्वाच असणार आहे...

जरांगे आज पाच वाजता पत्रकार परिषदेत करणार घोषणा

आज दिवसभर इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर मनोज जारंगे पाटील हे साधारणतः सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मतदार संघ आणि उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार देतात याची उत्सुकता महाराष्ट्रसह राजकारण्यांना देखील लागली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : सिन्नर विधानसभेचे संभाव्य आमदार कोण असणार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls: बार्शीत ठाकरे विरुद्ध शिंदे! कोण बाजी मारणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : परांडाचे संभाव्य आमदार तानाजी सावंत? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : परभणीतून राहुल पाटील होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Kolhapur News : शाळेचे गेट अंगावर पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू; कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT