Kolhapur Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Kolhapur Assembly Election: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला असून महायुतीने जोरदार बाजी मारली आहे.

Dhanshri Shintre

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला असून महायुतीने जोरदार बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी दहा जागांवर महाविकास आघाडीला झटका बसला असून सर्व जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र, ते सुद्धा भाजप बंडखोर उमेदवार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांना सर्वात मोठा तगडा झटका बसला असून पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.

महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सर्व दहा जागांवर भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. कोल्हापूर उत्तर मध्ये शिंदे सेनेचे राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांचा पराभव केला. तर दक्षिण मतदार संघात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना माजी आमदार अमल महाडिक यांनी पराभूत केले.

या निवडणुकीत काँग्रेसचे दोन तर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एक अशा तीन विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे. प्रियांका गांधी यांची सभा होऊनही फारसा परिणाम झालेला नाही.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष असताना सुद्धा मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय खेचून आणला होता. त्यामुळे त्या कामगिरीची पुनरावृत्ती सुद्धा काँग्रेसला करता आलेली नाही.

महाराष्ट्राचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

महाराष्ट्रातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १,८१७ कोटी; या ५ जिल्ह्यांत सर्वाधिक लाभार्थी

Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

Maharashtra News Live Update: नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

SCROLL FOR NEXT