Maharashtra Assembly Elections

Assembly Election: महायुतीच सरकार पूर्ण बहुमताने निवडून येईल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

Cm Shinde: निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुतीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय.

Bharat Jadhav

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्र्यांनी आज रात्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलवलीय. त्यापूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. महाविकास आघाडीच आणि सरकारच्या कामाचे मोजमाप नक्कीच होईल. कधी न झालेला विकास आम्ही केलेला आहे याची पोचपावती या महाराष्ट्रात जनता दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीच सरकार पूर्ण बहुमताने या निवडणुकीत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यात एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत विजयाचा दावा केलाय.

20 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस महाराष्ट्राचा भाग्य ठरवणारा दिवस आहे. गेल्या दोन सव्वादोन वर्षांमध्ये या महाराष्ट्रात महायुतीने केलेला काम आणि सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या जनतेसमोर आहेत. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठांपर्यंत, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वजण सत्तेचे वाटेकरी आहेत. ही सत्ता सर्वसामान्य लोकांची आहे, या सत्तेमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वाटेकरी बनून आम्ही या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

महाराष्ट्र हे प्रगतीकडे चालला आहे. महाराष्ट्र सर्व सुविधांमध्ये नंबर एक आहे, कल्याणकारी योजनांमध्ये नंबर एक आहे, याचा फलित येणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या मतदानाच्या लोकशाहीचा मोठा उत्सवात दिसेल, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT