Abdul Sattar News saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : अब्दुल सत्तार, संजय शिरसाट अन् अतुल सावे... छ. संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार ठरले, वाचा यादी

Maharashtra Politics News in Marathi : महायुतीने छ. संभाजीनगरमध्ये जवळपास आपले उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये दिग्गजांना संधी दिल्याचे समोर आलेय.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chhatrapati sambhaji nagar vidhan sabha election : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपावर चर्चा सुरु झाली आहे. महायुतीकडून मराठवड्यातील जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याचे समजतेय. छत्रपती संभाजीनगरमधील सात मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीने पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना मैदानात उतरवल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय शिरसाट यांची नावे निश्चित झाली आहे. त्याशिवाय खासदार संदीप भुमरे यांच्या मुलालाही उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले जातंय. यामध्ये विद्यमान आमदारांमध्य गंगापूरमधून प्रशांत बंब, वैजापूरमधून रमेश बोरणारे, सिल्लोड-सोयगावमधून अब्दुल सत्तार, संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे, संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट तर पैठणमधून खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य आणि फुलंब्री मतदारसंघांमध्ये नव्या उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी इच्छुक अधिक आहेत. फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण आणि राधाकिशन पठाडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात जिल्ह्यातून एका महिलेला उमेदवारी देण्यासंदर्भात विचार केला जात आहे. त्यामुळे अनुराधा चव्हाण यांना फुलंब्री मधून उमेदवारी मिळू शकते. तर संभाजीनगर मध्य मधून विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हे दोघेही इच्छुक आहेत.

Chhatrapati sambhaji nagar vidhan sabha election
Chhatrapati sambhaji nagar vidhan sabha election
Chhatrapati sambhaji nagar vidhan sabha election
Chhatrapati sambhaji nagar vidhan sabha election
Chhatrapati sambhaji nagar vidhan sabha election

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT