Ajit Pawar Vs Yugendra Pawar Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: बारामतीत काका विरुद्ध पुतण्या? युगेंद्र पवारांची उमेदवारी निश्चित?

Maharashtra Politics: बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई रंगणार आहे. विधानसभेला काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार काका अजित पवारांविरोधात दंड थोपटण्याची चर्चा रंगली होती. मात्र यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे दादांचं टेंशन वाढलंय. त्याची नेमकी काय कारणं आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच अजित पवारांनी बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करताच पवारांनी मोठा डाव टाकत युगेंद्र पवारांचं नाव निश्चित केलंय. एवढंच नाही तर पहिल्या यादीत युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे अजित पवारांचं टेंशन वाढलंय. त्याची कारणं काय आहेत पाहूयात.

पवारांचा डाव, दादांवर घाव ?

युगेंद्र पवारांना असलेला शरद पवारांचा पाठींबा

बारामतीत लोकसभेला सुळेंना मिळालेलं 47 हजार मतांचं लीड

बारामतीची निवडणूक दादांसाठी अस्तित्वाची लढाई

बारामतीत अडकून पडल्यास राज्यभरातील प्रचारावर निर्बंध येण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते. मात्र कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवून आंदोलन केलं. त्यामुळे अजित पवारांनी पुन्हा लढण्याची तयारी दाखवलीय. त्यातच आता युगेंद्र पवार मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झाल्याने दादांची कोंडी झालीय.. त्यामुळे दादा युगेंद्र पवारांना धोबीपछाड देणार की कुटुंबातील संघर्ष टाळण्यासाठी ऐन वेळी नवा मार्ग स्वीकारणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT