Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: सेम नेम कुणाचा गेम? कोणाची मतं खाणार, कोणाला फायदा होणार?

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक महत्वाच्या मतदारसंघात नाव साधर्म्य उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. प्रतिस्पर्ध्याने उभे केलेले हे डमी उमेदवार मुख्य उमेदवाराची मते खाणार हे उघड आहे. पाहूया यासंदर्भातला एक रिपोर्ट.

Girish Nikam

विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडालाय. नाराजी, बंडखोरी, डाव-प्रतिडाव यांना उत आलाय. प्रतिस्पर्ध्याची मते खाण्यासाठी आता नाव साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरवले जात आहेत. 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तेव्हा अनेक महत्वाच्या मतदारसंघात सारखे नाव असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.

हे डमी उमेदवार मुख्य उमेदवाराची मते खाणार हे निश्चित...कारण लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासमोर सारख नाव असलेल्या अपक्ष उमेदवारानं लाखो मत घेतली होती. त्यामुळे विधानसभेत नाव साधर्म्यामुळे चुरशीच्या लढतीत निकालावर परीणाम होऊ शकतो. पाहूया कोणत्या मतदारसंघात 'सेम टू सेम' नाव असलेले उमेदवार आहेत.

सेम नेम कुणाचा गेम ?

कर्जत जामखेड

राम शंकर शिंदे, उमेदवार, भाजप

राम प्रभू शिंदे - उमेदवार, ऑल इंडिया फॉर्वड ब्लॉक

राम नारायण शिंदे - अपक्ष उमेदवार

कर्जत जामखेड

रोहित राजेंद्र पवार - उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)

रोहित चंद्रकांत पवार,अपक्ष उमेदवार

रोहित सुरेश पवार, अपक्ष उमेदवार

नांदगाव

सुहास द्वारकानाथ कांदे, उमेदवार, शिवसेना शिंदे गट

सुहास बाबुराव कांदे, अपक्ष उमेदवार

नांदगाव

गणेश जगन्नाथ धात्रक, उमेदवार, शिवसेना ठाकरे गट

गणेश काशिनाथ धात्रक, उमेदवार, अपक्ष

नाशिक पूर्व

गणेश बबन गिते, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)

गणेश बबन गिते, उमेदवार, अपक्ष

माढा

अभिजीत धनंजय पाटील, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)

अभिजीत अण्णासाहेब पाटील, अपक्ष, उमेदवार

दापोली

संजय वसंत कदम, उमेदवार, शिवसेना ठाकरे गट

संजय संभाजी कदम, अपक्ष

दापोली

योगेश रामदास कदम, उमेदवार, शिवसेना शिंदे गट

योगेश रामदास कदम, अपक्ष

चिपळूण-संगमेश्वर

शेखर गोविंदराव निकम, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)

शेखर गंगाराम निकम, अपक्ष

चिपळूण-संगमेश्वर

प्रशांत बबन यादव, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (SP)

प्रशांत भगवान यादव, अपक्ष उमेदवार

वडगाव शेरी

बापू तुकाराम पठारे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)

बापू बबन पठारे, अपक्ष उमेदवार

लोकसभेला तुतारीशी सारखेपणा असलेली ट्रम्पेट चिन्हाने दिंडोरीत लाखभर मतं घेतली. तर साता-यात थेट निकालावरच परिणाम झाला. आता विधानसभेला सारख्या नावांमुळे कुणाचा गेम होतो की मतदार न गोंधळता योग्य उमेदवाराला मतदान करणार ते पहायचं...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

SCROLL FOR NEXT