Maharashtra Election 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election: राज्यात निवडणुकीचा धुराळा उडालाय. लोकसभेला पिछेहाट झाल्यानं महायुतीसाठी मोदी-शाह मैदानात उतरलेत. RSS ही मागे राहिला नाही. महायुतीच्या मदतीसाठी संघानेही एक मोहिम आखली आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलाय. लोकसभेला महायुतीची पिछेहाट झाल्यानं भाजपचं हायकमांड सर्तक झालं आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मागे राहिलेला नाही. संघाने भाजपला मदतीचा हात पुढे केला आहे.

महायुतीच्या विजयाची जबाबदारी आरएसएसच्या 'स्पेशल 65' ने घेतली आहे. मविआची प्रत्येक चाल अयशस्वी करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. जातीच्या आधारावर विभाजन होऊ नये, हे हिंदूंमध्ये रुजवण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी उचलली आहे. लोकसभेचा अनुभव लक्षात घेता विधानसभा निवडणुकीबाबत भाजप आणि महायुती कोणताही धोका पत्करायला तयार नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार RSS ने 65 हून अधिक मित्र संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात 'सजग रहो' म्हणजेच 'सावधान रहा, सतर्क रहा' ही मोहीम सुरू केली आहे. त्याचा उद्देश हिंदूंना एकत्र करणे, हिंदूंमधील जातीय फूट संपवणे हा आहे. आरएसएसचे स्वयंसेवक आणि 65 हून अधिक स्वयंसेवी संस्थांकडून विभागवार बैठका घेतल्या जात आहेत.

ज्या ठिकाणी भाजपला जातीच्या आधारावर मत विभाजनामुळे नुकसान सोसावे लागले, तेथील हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. चाणक्य प्रतिष्ठान, मातंग साहित्य परिषद आणि रणरागिणी सेवाभावी संस्थांचा या मोहिमेत समावेश आहे.

मोदींनी आपल्या पहिल्या सभेत 'एक है तो सेफ है' चा नवा नारा दिलाय. काँग्रेसनं हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान सुरू केल्याचा आरोप मोदींनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' असं म्हटलंय. त्यामुळेच RSS ने हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केलेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष सुरु आहे. मुस्लीम मतेही मविआच्या बाजूने वळली. लोकसभेत त्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. त्यामुळे आता हिंदू एकत्रीकरणाचं कार्ड विधानसभेला चालणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT