Maharashtra Assembly Elections

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Vidhansabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज केली जात आहे. यात महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होताना दिसत आहे. यात काँग्रेसचे तीन महत्वाचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, धिरज देशमुख पिछाडीवर गेले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांना होता. मागच्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी जनता आपल्या बाजूने असल्याचं ते म्हणत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवासाठी मोठी फिल्डिंग लावली होती.

विदर्भात भाजपने २५ जागा घेत महाविकास आघाडीला जोराचा धक्का दिलाय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजप ११५, शिंदे गट ५६, अजित पवार ३५ जागांवर आघाडी घेतली. तर मविआकडून शरद पवार गट ११, ठाकरे गट-२०, काँग्रेस -२२ जागांवर आघाडी घेतलीय. यात काँग्रेसचे तीन दिग्गज नेत्यांना जोरात मात मिळालीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, आणि बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत.

संगमनेर मतदारसंघात राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची कन्या यात मोठा वाद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT