Maharashtra Vidhan Sabha Election News Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election 2024 : सर्वात मोठी राजकीय बातमी, महाराष्ट्रात 'या' तारखेला होणार मतदान?

Maharashtra Vidhan Sabha Election News : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे.

Satish Daud

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकारपरिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन खलबंत सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून विधानसभेचा कार्यकाळ २८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

त्याआधी राज्यातील निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीतून पत्रकार परिषद घेत दुपारी 3 वाजता विधानसभा निवडणुकांची घोषणा करेल. निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होईल. मागील दोन दिवसांपासून राज्यात एकामागून एक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठका, निर्णयांचा सपाटा सुरु होता. तसेच रविवारच्या दिवशीही मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या लगबग होती.

त्यामुळे लवकरच निवडणुका लागणार असे संकेत मिळत होते. दरम्या, महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल, अशी Exclusive माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील मध्यल्या आठवड्यात मतदान घेतलं जाईल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT