Shevgoan Pathardi Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll : पाथर्डी शेवगाव मतदारसंघात मोनिका राजळे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Shevgoan Pathardi Constituency: यंदाच्या विधानसभेच्या लढाईत पाथर्डी शेवगाव मतदारसंघात कोणता पक्ष आपला गड कायम राखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Manasvi Choudhary

Maharashtra Exit Poll : दिवाळीनंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. नुकतंच संपूर्ण राज्यात काल विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. येत्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारी २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. यानुसार यंदाच्या विधानसभेच्या लढाईत पाथर्डी शेवगाव मतदारसंघात कोणता पक्ष आपला गड कायम राखणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

नुकताच सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार,पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या मोनिका राजळे या संभाव्य आमदार होऊ शकतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघात भाजपचं पारडं जड झाल्याचं दिसत आहे.

मागील गेले दोन ते तीन टर्मपासून भाजपचे वर्चस्व या मतदारसंघात आहे. भाजपच्या मोनिका राजळे या पुन्हा पाथर्डी शेवगावमधून जिंकून येतील असा अंदाज आहे. पाथर्डी शेवगाव मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होती. भाजपच्या मोनिका राजळे यांच्या सह राष्ट्रवादी शरद पवार गट प्रताप ढाकणे, अपक्ष चंद्रशेखर घुले हे उमेदवार रिंगणात उतरले होते. एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

प्रताप ढाकणे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. ते आमदारदेखील झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही चुरशीची लढत झाली. मात्र आता या मतदारसंघातून मोनिका राजळे या निवडून येणार असल्याचं चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT