उद्धव ठाकरे Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra politics :आधी बॅगा आता कारची तपासणी, उद्धव ठाकरेंच्या तपासणीवरुन राजकारण शिगेला

Uddhav Thackeray News : कोकणात ठाकरेंच्या कारची तपासणी करण्यात आली. सलग तिसऱ्या दिवशी ठाकरेंची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्राचे राजकारण तापलेय.

Girish Nikam

Maharashtra Assembly Elections 2024: उद्धव ठाकरेंच्या निवडणूक कर्मचा-यांनी बॅग तपासल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता कोकणात म्हणजेच राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट त्यांच्या कारची झडती घेण्यात आलीय. त्यामुळे यावरून पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर हा प्रकार घडला. गोव्यात विमानतळावर उतरुन कारने सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली. ज्या अधिकाऱ्याने गाडी अडवली. तो क्षणात तिथून गायब झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. ते संतापलेले दिसत होते. त्यांच्यासोबत गाडीमध्ये पुत्र तेजस ठाकरेही होते.

दरम्यान पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्याही बॅगा तपासण्यात आल्या. य़ावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत. युरिन पॉट नाही असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय...

यवतमाळमधील वणी आणि लातूरच्या औसामध्ये हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यावरुन मविआच्या नेत्यांनी मोदी, शाहांपासून ते महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी तपासणीचं व्हिडीओ काढून संताप व्यक्त केलाय. त्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. अरे आमच्यापण बॅग तपासल्या आहेत. अरे येवढा काय तमाशा करताय’, असा टोला राज यांनी लगावलाय. मात्र आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीचीच झडती घेतल्यामुळे आता हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT